मुंबई, वृत्तसंस्था । छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील नट्टू काका ही भूमिका साकारत घराघरात पोहचलेले अभिनेते घनश्याम नायक (वय – ७८) यांचे रविवारी निधन झाले. वर्षभरापासून त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते.
अबाल वृद्धांपर्यंत आवडीने पाहिल्या जाणाऱ्या ‘तारक मेहता’ मालिकेतील नट्टू काका ही त्यांची भूमिका प्रचंड गाजली. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर ते गेल्या वर्षभरापासून मालिकेपासून दूर होते. नायक यांनी कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष केला. प्रारंभी घन्यश्याम थिएटरमध्ये काम करताना त्यांना रोज तीन रुपये मिळत. नंतर त्यांना ७० च्या दशकात मोठ्या पडद्यावर संधी मिळाली.