Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»तापी नदीपात्रातून गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात तस्करी
    यावल

    तापी नदीपात्रातून गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात तस्करी

    saimat teamBy saimat teamFebruary 22, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ः तालुका प्रतिनिधी
    भुसावळ जवळ असलेल्या तसेच यावल तालुका कार्यक्षेत्रात असलेल्या तापी नदीपात्रातून आणि नदीच्या किनार्‍या लगतच्या भागातून मशनरीच्या माध्यमातून डबर,मुरूम इत्यादी गौण खनिजाचे उत्खनन करून दररोज हजारो ब्रास विना परमिट गौणखनिज अनधिकृतपणे वाहतूक करून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे.याकडे संबंधित यावल तहसीलदार यांच्यासह सर्कल, तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बांधकाम क्षेत्रातील ठेकेदारांकडून आणि रितसर नाममात्र परमिट काढून गौण खनिज वाहतूक करणार्‍यांमधून होत आहे.
    तापी नदीपात्रातून आणि तापी नदीच्या काठावर अधिकृत स्टोन क्रशर उद्योग सुरू आहेत एकूण ११ स्टोन क्रशर धारक आहेत हे सर्व स्टोन क्रशर तालुक्यातील अंजाळे,अकलुद,कासवा शिवारात असल्याची अधिकृत नोंद यावल तहसील मध्ये आहे यातील काही ठराविक आणि अनधिकृत असलेले स्टोन क्रशर उद्योजक मोठ-मोठ्या अत्याधुनिक मशनरी च्या माध्यमातून तापी नदीपात्रातून व तापी नदी लगत किनारपट्टीवरून डबर,मुरूम इत्यादी गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून नाममात्र रॉयल्टी भरून परमिट काढून आपापल्या सोयीनुसार दररोज हजारो ब्रास डबर, मुरूम गौण खनिजाची अनधिकृत वाहतूक व विक्री करून दरमहा कोट्यवधी रुपयांची कमाई करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल रॉयल्टी बुडवित आहे.
    स्टोन क्रशर उद्योजक गौण खनिजाचे किती उत्खनन करीत आहे? तापी नदी पात्रात आणि किनार्‍यालगत ८० ते ९० फूट खोल अंतराचे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होणार आहे किंवा नाही?उत्खनन करताना मुरूम, डबर किती ब्रास काढला गेला?आणि प्रत्यक्षात किती ब्रास डबर,मुरूम गौण खनिजाचे परमिट काढून रॉयल्टी भरली गेली आणि दररोज किती ब्रास डबर, मुरुमाची अवैध वाहतूक केली जात आहे याची तपासणी,चौकशी यावल महसूल विभाग का करीत नाही? असे गौण खनिज वाहतूक करणार्‍या अनेक ठेकेदार मध्येच बोलले जात आहे.
    तरी जिल्हाधिकारी जळगाव, प्रांताधिकारी फैजपूर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आतापर्यंत अवैध गौण खनिज उत्खनन किती प्रमाणात झाले आणि किती ब्रासची परवानगी स्टोन क्रशर उद्योजकांनी काढून रॉयल्टी किती भरलेली आहे याची चौकशी करून त्या काही स्टोन क्रशर उद्योजकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.