जळगाव प्रतिनिधी । तापी नदीतुन बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांची कारवाई करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
जळगाव तालुक्यातील विदगाव येथील तापी नदीतून बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर व ट्राली जप्त करत आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विदगाव येथे असलेल्या तापी नदीच्या पात्रातून बेकायदेशीररित्या चोरटी वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील यांना सूचना देवून कारवाई करण्याच्या आदेश दिले. सोमवार १० जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास जळगाव तालुका पोलीसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ बीजी ९४२२) वर कारवाई केली असता ट्रॅक्टर चालक व मालक ट्रॅक्टर सोडून पसार झाले. तालुका पोलिसांनी ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जमा केले आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालक व मालक यांच्याव गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस नाईक सुधाकर शिंदे करीत आहे.