जळगाव : प्रतिनिधी
शहरातील तांबापूरा भागातील बिस्मील्ला चौकात असलेल्या घरातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रुपये रोख व इतर वस्तू चोरून नेल्याचे काल पहाटे उघडकीस आले. याप्रकरणी काल रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील तांबापूरा भागात मोहसीन शेख सलीम (वय २४) रा.बिस्मील्ला चौक, हे आपल्या कुटुंबियासह राहतात. त्यांचे दुमजली घर आहे. १० जानेवारी रोजी रात्री १० वाजता घरातील कुटुंबिय जेवण करून खालच्या घरात झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी वरच्या घरात शिरून घरात ठेवलेले २५ हजार रूपयांची रोकड आणि हॅन्ड बॅग, केबलचे बुक चोरून नेल्याचे ११ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले.
याप्रकरणी मोहसीन शेख सलीम यांच्या फिर्यादीवरून ११ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. इम्रान सैय्यद हे करीत आहेत.