विविध विचार, स्वभाव आणि बरीच कारणे आपल्या चिंतेचे मूळ कारण असतात. एकंदरीत या चिंतेचे तणावात रुपांतर होते. तणाव दूर (stress free) व्हावा म्हणून वेळोवेळी घेतली जाणारी औषधी, आहारातील बदल यांचा तणाव किंवा चिंता कमी करण्यास फायदा होत नाही तर उलट शारीरिक समस्यात (physical problems) वाढ होते. चिंता वाढण्यामागचे नेमका कारण काय? आपल्याला नेमका कोणत्या गोष्टीमुळे त्रास होत आहे, याचे कारण शोधणे आवश्यक आहे. त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्यामागची सगळी कारणे शोधून तोडगा काढणे आवश्यक आहे.
आपण तणावात असाल तेव्हा काही वेळ डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला तर मनावरील ताण काही क्षणांत निश्चितपणे हलका होऊ शकतो. कमी वेळेत तणाव कमी करण्यासाठी या आहेत लाभदायक गोष्टी…
१) ग्रीन टी प्यावा : ग्रीन टीमध्ये थियेनिन असते. या रसायनामुळे मनातील राग क्षणात दूर पळतो.
२) एक चमचा मध : मधामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्याची मोठी क्षमता असते. यामुळे नैराश्य आणि तणावात अगदी एक चमचा मधानेही पुरेसा आराम मिळतो.
३) आवडती गाणी आठवा : तणावात आपली आवडती पाच-सहा गाणी आठवून ती गुणगुणली तरी तणाव कमी होण्यास फार मोठी मदत होऊ शकते.
४) चॉकलेट लाभदायी : कॉर्टिसोल हे तणाव कमी करणारे हार्मोन चॉकलेटमध्ये असते. त्यामुळे लाभ होतो.
५) च्युइंगम फायद्याचे : केवळ पाच मिनिटे च्युइंगम चघळले तर कॉर्टिसोलचे प्रमाण कमी होते व तणाव कमी होतो.
तणावमुक्त राहण्यासाठी काय करावे?
१. काम करत असलेल्या ठिकाणी वातावरण प्रसन्न ठेवा. तुम्हाला आनंद मिळणाऱ्या वस्तू आणि मनाला सुख देणाऱ्या गोष्टी करा.
२. तणावाचे भास वाटल्यास त्यावेळी एक दीर्घ श्वास घ्या, शांत ठिकाणी जाऊन स्वतःला वेळ द्या. सकारात्मक विचार करा.
३. जीवनात रोज घडणाऱ्या गोष्टी डायरीत लिहा. आवश्यकता अशा गोष्टीं त्या डायरीत लिहा.
४. चिंतामुक्त राहण्यासाठी योग किंवा ध्यानधारणा करा. विश्रांती मिळवण्याचे हे उत्तम तंत्र आहे.
५. स्वतः घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा.
६. कामाची योग्य योजना आखून त्याची सुरवात करावी.
७. न मागता कुणालाही सल्ला देऊ नये, तसेच आपलेच खरे अशा आविभर्वात वागण्याचा प्रयत्न करू नये.



