डॉ.सुधीर भटकर व डॉ.विनोद निताळे लिखित ‘संशोधन पध्दती’ पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशन

0
29

जळगाव ः प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील प्राध्यापक डॉ.सुधीर भटकर व डॉ.विनोद निताळे लिखित ‘संशोधन पध्दती’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
पुस्तक प्रकाशन सोहळा दि.१ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता कुलगुरुंच्या दालनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप पाटील, कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक डॉ.अनिल चिकाटे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे, अथर्व प्रकाशनचे संचालक युवराज माळी व संगीता माळी उपस्थित होते.
‘संशोधन पध्दती’ हे पुस्तक प्री-पीएच.डी. कोर्स वर्क, सेट-नेट तसेच पेट च्या अभ्यासक्रमावर आधारित असून या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे. या पुस्तकात संशोधन पध्दतीवर आधारित बहुपर्यायी प्रश्नोत्तरे आणि त्याच्याशी संबंधित माहिती विस्ताराने विशद केली आहे.हे पुस्तक सर्वच विद्याशाखेत संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे आहे. हे पुस्तक अथर्व पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. पुस्तक लेखनाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दीपक पाटील, वित्त व लेखाधिकारी सोमनाथ गोहिल,परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील, विधी व माहिती अधिकार विभागाचे उपकुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर, जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनिल पाटील आदिंनी जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर भटकर आणि डॉ.विनोद निताळे यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here