डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी महाअभियान

0
70

यावल, प्रतिनिधी । आज दि.19 बुधवार रोजी यावल नगरपरिषद स्वीकृत नगरसेवक तथा आश्रय फाऊंडेशनचे संचालक येथील डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडा सिम येथे सार्वजनिक दुर्गा मित्र मंडळाच्या ठिकाणी मोफत/ निशुल्क “ई”-श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास सुरुवात करण्यात आली.

सदर अभियानास सावखेडा ग्रामस्थांकडून बहुसंख्येने प्रतिसाद मिळाला.एकूण278 लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कुंदन फेगडे,सरपंच सौ.बेबाबाई पाटील.उपसरपंच मुबारक तडवी, वसंत पाटील,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाटील,भूषण पाटील, कालू तडवी,प्रकाश पाटील, विनोद पाटील,सलीम तडवी, खतीब तडवी,मुबारक तडवी आदींची उपस्थिती होती. सदरील अभियानास दिनेश पाटील,सलीम तडवी सर,सागर लोहार,विशाल बारी,जयवंत माळी,चेतन कापुरे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here