यावल (सुरेश पाटील):- आज शुक्रवार रोजी डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण क्षेत्रातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा,याकरीता अत्यावश्यक असलेले ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास तिसऱ्या सत्राला सुरुवात करण्यात आली हे अभियानाचे तिसरे सत्र अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवानी सुद्धा या अभियानाला मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.या अभियानास हरीपुरा व मोहराळा असे दोन गावातील नागरिकांचा समावेश होता सदर अभियान ग्रामपंचायत कार्यालय समोर मोहरळा तालुका यावल येथे आदिवासी बांधवांचे निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियान तिसऱ्या टप्यात पोचले.सदर अभियानास एकूण 369 लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला यावेळी गावातील सरपंच सौ.नंदा महाजन यांनी व उपसरपंच जहागीर तडवी यांनी डॉ.कुंदन फेगडे यांना पुष्पगुछ देऊन सत्कार केला अभियानाचे उद्घाटन डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले,या प्रसंगी मोहराळा गावाचे सरपंच नंदा महाजन,उपसरपंच जहागीर तडवी,लहू पाटील,यशवंत पाटील, प्रमोद महाजन,अनिल अडकमोल,भरत महाजन,भावना महाजन,शबाना तडवी,सुलेभान तडवी सुलतान तडवी,गफार तडवी,सुनील पाटील,धनराज पाटील,ज्ञानेश्वर पाटील,शरीफ तडवी किरण पाटील आदींची उपस्थिती होती.सदरील अभियानास रितेश बारी.सागर लोहार,मनोज बारी,विशाल बारी, जयवंत माळी,चेतन कापुरे,अक्षय राजपूत यांचे सहकार्य लाभले.