जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात आज अभियंता दिवस साजरा करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविता पवार या स्वयंसेविकेने कार्यक्रमास उपस्थित प्राचार्य, उप प्राचार्य, सर्व अभियंता व प्राध्यापक वर्गाचे स्वागत केले. त्यांनतर प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे यांच्या हस्ते भारतरत्न सर विश्वेश्वरय्या याच्या प्रतिमेची पुजा करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर ओंकार चव्हाण व कृतीका हरणे या स्वयंसेवकांनी भाषणे दिली.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कुशल ढाके,डॉ. सागर चव्हाण, प्रा. परीस यादव, प्रा. शीतल पाटील, प्रा. सर्वेश कुमार यांनी सर विश्वेश्वरय्या यांचा जन्म, शिक्षण व त्यांच्या जीवनातील विवीध अनुभव त्यांच्या कार्याबद्दल कथन करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनतर प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे यांनी अभियंता दिवसाचे महत्व समजावुन सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी ओंकार चव्हाण या स्वयंसेवकांने सर्वांचे आभार मानले त्यावेळी रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा. एन.डी. पाटील, आर. बी. पाटील,संजय सपकाळे, अजय गवादे,संदिप पौलझगडे, प्रशांत डिक्कर, योगेश सोनोणे, नवल तराडे,आशिष रौंदळे,निलेश भालतडक,पंकज मोरे प्रा. माधुरी कावळे, सुमैया शेख, सुप्रिया पाटील, अश्विनी मोळके व वैभव झाम्बरे, गणेश तायडे सोनिया इंगोले, नदीम तडवी, लोकेश फेगडे, सागर कोळी सोमनाथ चौधरी आणि सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.