डॉ.अविनाश आचार्य, उज्ज्वल निकम यांना देणार ‘जळगाव रत्न’ पुरस्कार

0
18

जळगाव ः प्रतिनिधी
सर्व समाजाला सोबत घेऊन चालत जाणारे व समाजावर निःस्वार्थ प्रेम करणारे डॉ. अविनाश आचार्य यांचा सातवा स्मृतिदिन काल डॉ. हुजुरबाजार हॉस्पिटलमध्ये साजरा झाला. डॉ. आचार्य यांच्या प्रतिमेस महापौर जयश्री महाजन माल्यार्पण करत आदरांजली वाहिली. तसेच डॉ. आचार्यांच्या कार्याची ओळख ही पिढ्यानपिढया समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कोरोनाचा संक्रमण काळ संपल्यानंतर जळगाव शहर महानगरपालिका व समस्त जळगावकरांच्या वतीने डॉ. आचार्य व प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना ‘जळगाव रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे महापौर महाजन यांनी सांगितले.
यावेळी डॉ. संजीव हुजूरबाजार, डॉ. आरती हुजूरबाजार, शिवम हुजूरबाजार, ऐश्वर्या हुजूरबाजार, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, उपमहापौर कुलभूषण पाटील, ललित धांडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना महापौर सौ. महाजन म्हणाल्या की, दादांनी समाजाची सेवा करण्याची कृतीशील भगवद् गीताच जणू लिहून ठेवली आहे. त्यांच्या मार्गदर्शक पथावर निरंतर कार्य करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल. आम्ही सर्व समस्येवर या कृतीसाठी वचनबध्द आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here