Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»डीपीसीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून शेतकर्‍यांसाठी ट्रान्स्फॉर्मर देणार
    जळगाव

    डीपीसीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून शेतकर्‍यांसाठी ट्रान्स्फॉर्मर देणार

    saimat teamBy saimat teamDecember 5, 2020No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    जिल्हाभरात शेतकर्‍यांना कृषी पंपासाठी ट्रान्स्फॉर्मर मिळवण्यासाठी महावितरणकडून अडचणी येत आहेत. दुरुस्ती आणि ऑइलसाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधी देणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलताना दिली. याबाबत तातडीने जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन शेतकर्‍यांना तातडीने ट्रान्स्फॉर्मर देणार असल्याचे ते म्हणाले.
    शिवसेनेची जिल्हा बैठक अजिंठा विश्रामगृहात झाली. या वेळी पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांकडून मांडलेल्या अडचणींवर पालकमंत्री बोलत होते. आमदार किशोरअप्पा पाटील यांनी शेतकर्‍यांना वेळेत ट्रान्स्फॉर्मर मिळत नसल्याने पिके धोक्यात आल्याचे सांगितले.
    या वेळी आमदार चिमणराव आबा पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन,जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, गोपाळ चौधरी, पद्मसिंग पाटील, धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे,युवासेना प्रमुख शिवराय पाटील यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी केले. आमदार चिमणराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या पॅटर्नमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी किमान ४० जागा आपण जिंकू शकतो,असा विश्‍वास व्यक्त केला. जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी प्रास्ताविक केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.