डीजेच्या गाण्यावरून राष्ट्रवादी अपक्ष, व प्रहार यांच्यात जुगलबंदी

0
17
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

यावल, प्रतिनिधी । यावल शहरात एका लग्न समारंभात डीजे वाजंत्री च्या गाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ति पार्टी समर्थक आणि अपक्ष लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणात जुगलबंदी झाल्याची चर्चा संपूर्ण यावल शहरात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरातील विकसित भागातील एका कॉलनीत गेल्या दोन तीन दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेस एका लग्न समारंभात डिजेवर आपल्याच आवडीचे गाणे वाजविले गेले पाहिजे,हे गाणे बंद करा ते गाणे बंद आम्ही सांगितलेले गाणे सुरु करा या कारणावरून यावल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि काही प्रहार जनशक्ती पक्षाचे समर्थक तथा अपक्ष लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांची डीजे आवाजाबरोबर चांगलीच खडाजंगी आणि हमरीतुमरी झाल्याची संपूर्ण यावल शहरात चर्चा आहेत.
प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी यावल शहरातील सर्वांना परिचित असलेल्या आणि आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही अशा संभ्रमात असलेल्या त्या काही लोकप्रतिनिधींना आणि वारंवार मध्यस्थी करणाऱ्यांची त्या ठिकाणी बोलती बंद केली. राजकीय,सार्वजनिक,घरगुती किंवा कोणताही कार्यक्रम असो यावल शहरात डीजे वाजंत्री लावताना परवानगी देते वेळी पोलिसांनी लग्न समारंभ किंवा इतर काही कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना आणि डीजे चालकाला काही महत्त्वाच्या सूचना देऊन वेळेचे आणि डीजे किती डेसीबल/आवाजाच्या मर्यादेत ठेवायला पाहिजेत अशा सूचना देऊन आणि सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्यावर यावल पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here