यावल, प्रतिनिधी । यावल तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रात पूर्व भागात डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांनी तसेच पश्चिम भागात यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी वाळू चोरटी वाहतूक करणारे वाहन पकडून गुन्हे दाखल केले परंतु याच दरम्यान महसूल पथकाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून एक वाळूचे ट्रॅक्टर पकडून 70 ते 80 हजारात तडजोड करून सोडल्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा असून वाळू तस्करांमधील आपआपसातील व्यवसायिक स्पर्धेमुळे वाळू प्रकरण चव्हाट्यावर येत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
31जानेवारी 2022 रोजी दुपारी15:30 वाजेच्या दरम्यान मनवेल थोरगव्हाण रस्त्यावर पिळोदा फाट्याजवळ ट्रॅक्टर द्वारे अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची खबर यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशानुसार पो.कॉ.सुशील घुगे,मुजफ्फर खान,सिकंदर तडवी,राहुल चौधरी या पोलिस पथकाने वाळूची चोरी करून अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून यावल पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भाग 5 भा.द.वी.379 कलमान्वये गु.र.नं.51/2022 गुन्हा नोंद केला.
याच प्रमाणे फैजपूर भाग उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त खबरी वरून यावलकडून फैजपूरकडे अवैध वाळूची वाहतूक करणारे डंपर क्र.एम.एच-40AK-3867 हिंगोणा गावाजवळ पेट्रोल पंपाजवळ डिवायएसपी यांचे शासकीय वाहनावरील चालक पो.हे.का.दिलीप नामदेव तायडे,पो.कॉ.अल्ताफ अली हसन अली सय्यद यांना आढळून आले यांनी हा अवैध चोरटी वाहतूक करणारा डंपर एकूण जप्त केलेला माल 4 लाख 9 हजार रुपये किमतीचा ताब्यात घेऊन फैजपुर पोलीस स्टेशनला भादवि कलम 379,109 इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे सदरचे डंपर यावल महसूल कार्यक्षेत्रातून फैजपूरकडे गेला कसा?याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होते का? तसेच याच दिवशी महसूल पथकाने चोरीची वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले असता आपल्या वरिष्ठ एका अधिकाऱ्यांशी चर्चा करून 70 ते 80हजार रुपयाची तडजोड करून अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर सोडून दिल्याची चर्चा साकळी दहिगाव गटात,परिसरात आहे. यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर यांची संख्या जास्त असून महसूल मधील कर्मचारी फक्त काही ठराविक ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करीत असून इतर डंपर आणि ट्रॅक्टर चालकांवर कधीही कारवाई करीत नसल्याचे तसेच काही ठिकाणचे नियुक्त सर्कल तलाठी आपल्या ओळखीचे डंपर, ट्रॅक्टर चालकांवर कारवाई का करीत नाहीत?याबाबत सुद्धा अवैध वाळू वाहतूक धारांमध्ये बोलले जात आहे त्यामुळे अवैध वाळू वाहतूक धारांमध्ये व्यावसायिक स्पर्धा निर्माण झाल्याने काही गब्बर अवैध वाळू वाहतूकदार महसूल विभागास गुप्त खबर देऊन अवैध वाळूचे ट्रॅक्टर सुद्धा पकडून देत असल्याचे बोलले जात आहे याकडे फैजपुर भाग प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी लक्ष केंद्रीत करून ठोस कडक कारवाई करावी असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.