जळगाव, प्रतिनिधी | यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे स्वयंदीप प्रतिष्ठान अंतर्गत शासकीय योजना व माहिती समिती डांभूर्णीतर्फे शनिवार दि. ३० ऑक्टोबर रोजी आयोजित ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आ. लता चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. स्वयंदीप प्रतिष्ठान अंतर्गत शासकीय योजना व माहिती समिती डांभूर्णीतर्फे ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप शिबिराचे सकाळी १०.३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजन करण्यात आलेले आहे. याशिबिराचे उद्घाटन आ. लता चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सेतू सुविधा कक्ष (आपले सरकार पोर्टल)चे उद्घाटन तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, माजी जि. प. सदस्य आर. जी. पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, बाजार समिती सभापती तुषार पाटील आदींसह उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कासारखेडा सरपंच भागवत पाटील, उंटावद विकासो अध्यक्ष शशिकांत पाटील, स्वयंदीप प्रतिष्ठान संचालक अशोक सोनवणे आदी उपस्थित राहणार आहेत.