डंपर व टँकरचा अपघातात डंपर चालक ठार

0
51

जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढे खिर्डी फाट्यावरील मुजोंबा मंदिरासमोर डंपर व ट्रँकर यात भीषण अपघात होत एक जण ठार झाल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढे भुसावळकडे खिर्डी फाट्यावरील मुजोंबा मंदिरासमोर भुसावळकडून जळगावकडे जाणारा डंपर (क्र.एम.एच.१९-झेड.३१२३) हा त्याच्या बाजूने जात होता. त्याचवेळी विरुध्द दिशेने आपल्या बाजूची लेन सोडून ट्रँकर (क्र.एम.एच.१८-बीए.४१८८) ड्रायव्हरने भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत समोरुन येणार्‍या डंपरला जबर धडक दिली. या भिषण अपघातात डंपरवरील चालक देवानंद नथ्थू पाटील (वय ३५, रा.साकेगाव, ता.भुसावळ) हा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यास उपचारार्थ डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले असता तो गतप्राण झाला. याबाबत नशिराबाद पोलीसात वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास गायसमुद्रे यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, सकाळी ६ वाजेच्या सुमारास अपघाताची घटना घडल्यानंतर भुसावळकडून जळगावकडे येणार्‍या महामार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस स्थानकाचे एएसआय संजय जाधव, पाहेकॉ असमतअली सय्यद, पोना. संतोष ईदा आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात तात्काळ हलविले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here