ठाकरे सरकार प्रताप सरनाईक यांच्यावर मेहरबान; इमारतीचा दंड माफ होण्याची शक्यता

0
7

मुंबई : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी ईडी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक पुन्हा एकदा समोर आले आहेत. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड ठाकरे सरकार माफ करण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी मुंबईत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाऊ शकतो. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास आमदारासाठी असा विशेष निर्णय घेण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असेल. याशिवाय ठाकरे सरकार सरनाईक यांच्या छाबय्या विहंग इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे आदेशही महामंडळाला देऊ शकते. त्यामुळे ठाकरे सरकार अचानक प्रताप सरनाईक यांच्यावर इतके मेहेरबान का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीमार्फत झालेल्या कारवाईने मोठे वादळ उठले होते. ईडीने सरनाईक यांच्या मालमत्ता व कार्यालयांवर धाडीही टाकल्या. ‘टॉप्स सिक्युरिटी’ घोटाळ्याप्रकरणी सरनाईक यांच्यावर आरोपही झाले. त्यांच्या कथित घोटाळ्यांविरोधात आवाज उठवण्यात भाजपा नेते किरीट सोमय्या आघाडीवर होते. सरनाईक यांनी गेल्यावर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपासोबत पुन्हा जुळवून घेण्याची विनंती केली होती. सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. तुमचा पक्ष कमकुवत होत असेल, तर मोदींशी आघाडी करणे चांगले, असे ते म्हणाले होते.

गेल्या दीड वर्षांत तुमच्या पक्षाच्या अनेक आमदारांशी माझी चर्चा झाली आहे. अशावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची कामे कशी होतात? आपला मुख्यमंत्री असतानाही आपली कामे का होत नाही? अशी त्यांची भावना आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. पण काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन केली का? अशी चर्चा सुरू आहे, असे सरनाईक यांनी पत्रात नमूद केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here