ट्रकचे चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक

0
16
ट्रकचे चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक

जळगाव प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहराजवळ ट्र्कचे चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक दिली. याप्रकरणी या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.

वरणगाव शहरापासून कुशल ढाब्यासमोर एका ट्रकचे चाक फुटल्यामुळे तो रस्त्यातच उभा होता पाठी मागून येणारा आयशर मालवाहू ट्रक समोर उभ्या असलेल्या या ट्रकला जोरात धडक दिल्यामुळे भुसावळ कडे जाणार्‍या ट्रक मधील ड्रायव्हर जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव हद्दीतील नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील कुशल ढाब्याच्या समोर टायर फुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा होता. हा ट्रक उभा असल्याचे लक्षात न आल्यामुळे पाठीमागून येणार्‍या ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे पाठीमागून येणार्‍या ट्रक मधील ड्रायव्हर जागीच ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात इतका विचित्र होता की अपघातग्रस्त झालेल्या ट्रक मधून ड्रायव्हरला बाहेर काढणे सुद्धा कठीण झाले होते स्थानिक नागरिकांच्या मदतीने ड्रायव्हरला बाहेर काढून शव विच्छेदनासाठी वरणगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here