टीईटी पेपर फुटीप्रकरण शिवकुमारने 30 लाख रूपये  दिल्याचे सांगितल्याने आयुक्त तुकाराम सुपेच्या अडचणीत आणखी वाढ

0
63

पुणे : वृत्तसंस्था । टीईटी पेपरफुटीप्रकरणी जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार याने परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याला तब्बल 30 लाख रूपये दिले. शिवकुमारनेच ही माहिती पोलिसांना दिली आहे. त्यामुळे तुकाराम सुपे याच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.
2018 मध्येच हे प्रकरण उघडकीला आले असते पण सुपे याने ते दाबून टाकले, अशी माहिती शिवकुमारकडून बाहेर आली आहे. टीईटी पेपरफुटीप्रकरणी सुपे आणि परीक्षा घेणाऱ्या जीए कंपनीचा संचालक डॉ. प्रितीश देशमुखचा एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना अटक करण्यात आली आहे.
बनावट प्रमाणपत्र आल्यावर सुपेने कारवाई का केली नाही, प्रमाणपत्र मिळालेले ते  18 विद्यार्थी कोण, असे प्रश्‍न यातून उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, राज्यात 2012 मध्ये राबवण्यात आलेल्या पटपडताळणी मोहिमेत दोषी आढळलेल्या 282 शाळांकडून 4 कोटी 14 लाख  रूपये वसूल केले जाणार आहेत. शिक्षण संचालकांनी हे आदेश दिलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here