टाटा स्‍टारबक्‍स कडून नाशिकमध्‍ये स्‍टोअरचे उद्घाटन करत भारतातील २३ शहरांमध्‍ये विस्‍तार

0
23

 

नाशिक: टाटा स्‍टारबक्‍स प्रायव्‍हेट लिमिटेडने आज शहरामध्‍ये पहिल्‍या स्‍टोअरच्‍या उद्घाटनासह नाशिकमध्‍ये प्रवेश केल्‍याची घोषणा केली. नाशिक हे स्‍टारबक्‍ससाठी महाराष्‍ट्रातील ४थे शहर, तर भारतातील २३वे शहर आहे. ज्‍यामुळे भारतीय ग्राहकांना अस्‍सल स्‍टारबक्‍स अनुभव देण्याचा लक्ष केंद्रित करत देशभरातील ब्रॅण्‍डची उपस्थिती अधिक प्रबळ झाली आहे. हे नवीन स्‍टोअर ग्राहकांना स्‍टारबक्‍स सिग्‍नेचर बेव्‍हरेजस्, तसेच फूड पर्यायांचा अनुभव देण्‍यासोबत सर्वांसाठी स्‍वागतार्ह थर्ड प्‍लेसची निर्मिती करेल. हे नवीन स्‍टोअर नाशिकच्‍या प्रमुख हाय-स्ट्रीट भागातील स्‍टेटस बिल्डिंग, श्रीजी स्‍टेटस, सिटी सेंटर मॉलच्‍यासमोर, उंटवाडी रोड येथे स्थित आहे.

”हे टाटा स्‍टारबक्‍सचे भारतातील १०वे वर्ष आहे आणि आम्‍हाला विश्‍वासार्ह व सर्वोत्तम संस्‍कृतीची निर्मिती करत २३ शहरांमधील २४६ स्‍टोअर्ससह देशभरातील आमची उपस्थिती वाढवण्‍याचा आनंद होत आहे. नाशिकमधील नवीन स्‍टोअरसह महाराष्‍ट्रातील आमची उपस्थिती अधिक दृढ करण्‍याचा प्रयत्‍न भारतातील स्‍टारबक्‍ससाठी आमच्‍या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे,” असे टाटा स्‍टारबक्‍स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत दा म्‍हणाले.

शहरातील द्राक्षमळे व कॉफी परिदृश्‍यामधून प्रेरित स्‍टोअरमध्‍ये कलाकृती आहे, ज्‍यामधून स्‍टारबक्‍स कॉफी वारसा आणि कंपनीचा मानवी उत्‍साह – वन पर्सन, वन कप आणि वन नेबरहूड अॅट ए टाइमला प्रेरित करण्‍याचा उद्देश दिसून येतो. स्‍टोअरच्‍या टोकाला असलेले मोठे भित्तीचित्र कॉफी परिदृश्‍याचा अनुभव देते, ज्‍यामधून कॉफी व कृषीवर केंद्रित कथानकाचा अनुभव मिळतो. बारवरील फीचर वॉल स्‍थानिक कंदीलांसह सजलेला आहे, जी क्‍यूबिक थिओड्रोम या गणितीय सुत्राचा वापर करून निर्माण करण्‍यात आली आहे आणि स्‍टोअरसाठी पार्श्‍वभूमी म्‍हणून सेवा देते.

तसेच ग्राहकांना स्‍टारबक्‍स पेयांच्‍या व्‍यापक श्रेणीसोबत आवडत्‍या पेयांचा देखील आस्‍वाद घेता येईल, जसे जावा चिप फ्रॅप्‍युचिनो®, कॅफे मोका, सिग्‍नेचर हॉट चॉकलेट आणि कॅरॅमल माचीयातो. ग्राहक विंटर ऑफरिंग्‍जचा देखील आस्‍वाद घेऊ शकतात, जसे स्‍मोक्‍ड बटरस्‍कॉच लॅटे, चॉकलेट ट्रफल कोल्‍ड ब्रू आणि कोकोआ चाय अल्‍मंड लॅटे. कॉफी ऑफरिंग्‍जच्‍या व्‍यापक श्रेणीसोबत ग्राहक खाद्यपदार्थांच्‍या श्रेणीमधून देखील निवड करू शकतात- जसे एग व्‍हाइट अॅण्‍ड चिकन इन मल्‍टीग्रेन क्रोइसंट, डच ट्रफल गॅटो, रेड वेल्‍वेट अॅण्‍ड ऑरेंज केक, चीज टोस्‍ट, बेझिल टोमॅटो अॅण्‍ड मोझेरेला चीज सँडविच, बटर क्रोइसंट, काकोरी कबाब रॅप इत्‍यादी.

स्‍टारबक्‍स मर्चंडाइज व मोफत वाय-फाय स्‍टोअरमध्‍ये उपलब्‍ध आहे. स्‍टारबक्‍स शहरामध्‍ये स्‍टारबक्‍स रिवॉर्डस™ लॉयल्‍टी उपक्रम देखील राबवणार आहे. हा उपक्रम स्‍टारबक्‍सला आपल्‍या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणा-या सदस्‍यांना रिवॉर्डस् व वैयक्तिक लाभ देतो.

देशभरात स्‍टारबक्‍स संबंधित शहरांमध्‍ये जारी करण्‍यात आलेल्‍या मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करत डाइन-इन व टेकअवेजसाठी पुन्‍हा सुरू झाले आहेत. सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देत टाटा स्‍टारबक्‍स सतत साफसफाई, सॅनिटायझेशन आणि अतिरिक्‍त खबरदारी घेत आहे, जसे प्रतिक्षा कक्षांमध्‍ये सोशल डिस्‍टन्सिंगसाठी फ्लोअर मार्कर्स, सर्व भागीदार व ग्राहकांचे तापमान तपासणी आणि डिलिव्‍हरी कार्यकारी व भागीदारांना फेशियल कव्‍हरिंग्‍स व ग्‍लोव्‍ह्ज. टाटा स्‍टारबक्‍सने स्‍टारबक्‍स इंडिया मोबाइल अॅप्‍लीकेशनच्‍या माध्‍यमातून मोबाइल ऑर्डर अॅण्‍ड पे अशा कॉन्‍टॅक्‍टलेस ऑर्डर व पेमेण्‍ट पद्धती देखील सादर केल्‍या आहेत. ज्‍यामुळे ग्राहक सुरक्षित, परिचित व सोईस्‍कर स्‍टारबक्‍स अनुभवाचा आनंद घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here