Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»टाटा सुमोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
    जळगाव

    टाटा सुमोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

    saimat teamBy saimat teamApril 22, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    ममुराबाद रोडवरील मनुदेवी मंदिरानजीक भरधाव जाणार्‍या टाटा सुमोने दुचाकीस समोरुन जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी होत जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीवरील दुसरा तरुण जखमी झाला आहे.
    याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील अमोल संभाजी पाटील (वय २२) व गोलू रमेश पाटील हे दोन्ही तरुण दुचाकी बजाज प्लॅटीना (एम.एच.१९-डीएम.७६३६) ने जळगावकडे येत असताना ममुराबाद जळगावदरम्यान मनुदेवी मंदिराजवळ जळगावकडून ममुराबादकडे जाणार्‍या टाटा सुमो (एम.एच.१९-एएक्स.५६५१) ने दुचाकीस जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील अमोल संभाजी पाटील हा गंभीर जखमी झाला व जागीच गतप्राण झाला. दरम्यान, टाटा सुमोवरील चालकाने अपघाताच्या घटनेकडे दुर्लक्ष करत टाटा सुमो भरधाव वेगाने घेवून गेला. यावेळी रस्त्यावरील नागरीकांनी टाटा सुमोचा पाठलाग करत टाटा सुमो चालकाला ममुराबाद येथे अडकविले असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा तालुका पोलीस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : महाशिवरात्री निमित्त जळगावात ब्रह्माकुमारीजचा भव्य उपक्रम

    February 14, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.