झाशीची राणी महिला मंडळाची कार्यकारिणी जाहीर

0
18

जळगाव ः प्रतिनिधी
येथील शिवाजीनगरातील खडके चाळ येथील झाशीची राणी महिला मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
मंडळाच्या अध्यक्षपदी सुनीता अनिल चौधरी, उपाध्यक्षपदी भाग्यश्री हर्षल बाविस्कर तर सरचिटणीसपदी रंजना डिगंबर कोळी, सचिवपदी वैशाली चंद्रकांत इंगळे, सदस्य म्हणून कविता संतोष सोनवणे, आशा मनोज मोरे, अलका संजय मिस्तरी, वर्षा मंगल पाटील, शोभा अशोक झुंजारराव, भारती दिलीप सोनवणे, नंदा युवराज सोनवणे, रेखा प्रदीप तायडे, वंदना नारायण रायसिंगे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणीचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्ष वाढवण्याची जबाबदारी देखील महिला मंडळाने घेतली. त्यानंतर हळदीकुंकवाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव वैशाली चंद्रकांत इंगळे यांनी तर आभार अध्यक्षा सुनीता अनिल चौधरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here