जळगाव : छगनसिंग पाटील
बीएचआर अवसायक व इतरांनी संस्थेची व ठेवीदारांची फसवणुक केली.संघटितपणे कट रचून संस्थेची व ठेवीदारांची फसवणुक केल्याने संबंधितांवर संघटित गुन्हेगारी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या सार्या घटनाक्रमात गुन्ह्यातील आरोपींच्या घरावर छापा टाकला असता सुनिल झंवर यांचेकडे शंभराच्या वर अधिक उच्च पदस्थ अधिकारी यांचे सिक्के सापडले.नेमके हे सिक्के संबंधित अधिकारी यांच्या परवानगीशिवाय सिक्के बनविणार्या व्यावसायिकाने बनविलेच कसे? ते बनविण्यासाठी त्याच्यावर कुणाचा दबाव होता? की अधिकच्या लाभापोटी त्याने हे बेकायदेशीर काम करण्याचे धाडस केले? या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी चौकशी होण्याची दाट शक्याता आहे. गेल्या काळात आर्थिक व्यवहार असणार्या व्यक्तींचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे शहारातील सिक्के बनविणार्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
या घोटाळ्याच्या प्रकरणात मास्टरमाईंड व मोठा लाभार्थी असणार्या सुनिल झंवरने हे शिक्के कुठून बनवले व त्यांचा गैरवापर कुठे कुठे करण्यात आला. यामुळे शासकीय यंत्रणेची मोठ्याप्रमाणावर फसवणूक करून कोट्यवधींचे गैरव्यवहार झाले असावेत अशी साशंकता व्यक्त होत आहे.सुनिल झंवरचे बेकायदेशीर गोष्टी करण्यात चांगलेच धाडस बळावले होते. हे त्याचेकडे मिळून आलेल्या शंभराच्या वरील अधिकार्यांचे बनावट शिक्के , इतर दस्ताऐवज यावरुन लक्षात येते. माजी मंत्री गिरीष महाजन यांनी सुनिल झंवर यांचेशी असलेले संबंध नाकारलेले नाहीत,नव्हेतर आधीपासूनचे संबंध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे झंवर याचेकडे सापडलेले महाजन यांचे कोरे लेटर हेड हे समंतीविना अथवा बनावट असूच शकत नाही असा ठाम विश्वास जनमानसात व्यक्त होताना दिसत आहे.या पत्रांचा, बनावट शिक्क्यांचे वापर कुठे, कसा केला गेला, हे तपासात निष्पन्न होईल. मात्र त्याच्या गैरवापरमुळे कोणत्या खात्याला कितीचा फटका बसला असेल हे चौकशी अंती लक्षात येईलच पण किती अधिकार्यांच्या नोकरींवर गदा येईल हे येणारा काळच ठरवेल.