जळगाव ः प्रतिनिधी
राज्य शासनाने २०१९ मध्ये ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी रद्द करून सदर योजनेत सुधारणा करून जळगावातील १२ ज्येष्ठ पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी करणारे पत्र जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करावयाच्या पत्रकार दिनी जळगावातील बारा ज्येष्ठ पत्रकारांनी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले त्यात शिवलाल बारी, मोहन साळवी, अरूण मोरे, केदारनाथ दायमा, सुभाष पाटील, अशोक जैन, अनिल मुजूमदार, जमनादास भाटीया,विजय पाटील, प्रकाश पत्की, दिनेश दगडकर यांचा समावेश होता.