धरणगाव ः प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ पत्रकार मगनलाल मोतीलाल बन्सी(वय ७०) यांचे आज दि.२२ रोजी दुपारी १२.३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. कोवीडची लस घेतल्यानंतर दोन दिवसापुर्वी त्यांना प्रकृती बिघडल्याने जळगाव येथील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचार घेत असतांना आज दुपारी १२.३० वा.त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांनी साप्ताहिक पोलखोल प्रतिनिधी म्हणून सुरुवात केली व त्यानंतर त्यांनी गावकरी,जनशक्ती, साईमत व इबीएम न्युजचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले.एक जुने-जाणते पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक होता.त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वा. धरणगाव येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्रसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.