ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

0
43

पुणे : बजाज ऑटोमाबईलचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे वयाच्या 83 व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले आहे. बजाज हे गेल्या काही काळापासून कर्करोगाने त्रस्त होते.
राहुल बजाज यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते मात्र त्यांची रुबी हॉल क्लिनिकध्ये प्राणज्योत मालवली. राहुल बजाज यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज गृपची सूत्र हातात घेतली. राहुल बजाज यांच्या नेतृत्वात बजाज ग्रृपचा टर्नओव्हर हा 7.2 कोटींवरुन थेट 12 हजार कोटीवर जाऊन पोहचला. बजाज स्कूटर विकणारी देशातील अव्वल ग्रृप म्हणून नावारुपास आला. त्यानंंतर 2005 मध्ये ग्रृपची जबाबदारी त्यांचे पुत्र राजीव बजाज यांंना देण्यात आली.तेव्हा राहुल बजाज यांनी राजीव यांना मॅनेजिंग डायरेक्टर पदाची जबाबदारी सोपवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here