ज्ञानगंगा विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी  विवेकानंद जयंती संपन्न.

0
5
 जामनेर(प्रतिनीधी):– येथील ज्ञानगंगा माध्यमिक व            उच्च   माध्यमिक  विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती काल दि.१२ रोजी साजरी करण्यात आली.यावेळी ऑनलाईन झूम मिटिंग द्वारे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेेचे पूजन प्राचार्य राजेंद्र सोनवणे व उपशिक्षक विजय कोळी यांनी केले. त्यानंतर  सर्वांनी प्रतिमेस अभिवादन केले.सदर प्रसंगी ऑनलाईन पद्धतीने  इ.९वी ची विद्यार्थ्यांनी कु .वैष्णवी बेलदार हिने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा धारण करून जिजाऊ वंदना गायली. प्रास्तविक शाळेचे उपशिक्षक  विनय खोंडे सर यांनी केले. विद्यालयातील  सर्व शिक्षक बंधू – भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित  होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here