जळगाव ः प्रतिनिधी
तरूणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी. त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे. त्यासाठी विविध उपक्रम घेऊन जनजागृती निर्माण करण्याची गरज ओळखून जेसीआय डायमंड सिटी व रोटरी स्टार्स तर्फे वाचनाची गोडी टिकवण्यासाठी ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली.
झूम प्लॅटफॉर्मवर जेसीआय जळगाव डायमंड सिटी मार्फत झोन समन्वयक जिनल जैन यांच्याकडून ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये वाचन प्रेरणा हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जिनल जैन म्हणाले की, तरुणांमध्ये तसेच ग्रामीण भागातील काही भागांमध्ये वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर त्यांच्यासमोर तशी परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे.वाचनानेच माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ, वर्तमानपत्र, थोर पुरुषांची पुस्तक, आत्मचरित्र हेच आजचे गुरु आहेत.
तरूणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी. त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे. त्यासाठी विविध उपक्रम घेऊन जनजागृती निर्माण करण्याची गरज ओळखून जेसीआय जळगाव डायमंड सिटी हा उपक्रम करण्याचा मानस केला . ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रत्येक ठिकाणी ग्रामीण व शहरी भाग तळागाळा पर्यंत जाऊन राबविण्यासाठी कोविड १९ च्या नियमांचे तंतोतंत पालन करून वर्तमानपत्रे, मासिके, अवांतर वाचनाची पुस्तके, यांना सॅनिटायझ करून त्यांचे घरोघरी ग्रामस्थना, विद्यार्थीना, वाटप करून वाचन संस्कार रुजवावे असे आवाहन जिनल जैन यांनी केले.
यावेळी आभार व सूत्रसंचलन व जेसीआय चे अध्यक्ष सुशील अगरवाल यांनी केले तसेच रोटरी स्टार चे अध्यक्ष धनराज कासट यांचा जास्तीत जास्त जनजागृती करून हा उपक्रम करण्याचा संस्थेचा मानस राहील असे सांगीतले.