जळगाव : प्रतिनिधी I येथील जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे त्र्यंबकनगर प्राथमिक शाळेत आरोग्य शिबिर घेण्यात आले. लहान मुलांची तपासणी करण्यात आली.
प्रकल्पप्रमुख डॉ. गोविंद तापाडिया, सहप्रकल्प प्रमुख चंदन पाटील, उपाध्यक्ष मनोज भालेराव यांच्या संकल्पनेतून शिबिर घेण्यात आले. समन्वयक जिनल जैन, आयपीपी सुशील अग्रवाल, अध्यक्ष विशाल शर्मा, उपाध्यक्ष गोविंद पाटील, किशोर पाटील आदिंनी उपक्रमास सहकार्य केले.