जि.प.जळगाव सदस्य संघटना अध्यक्षपदी कॉंग्रेस गटनेते प्रभाकर सोनवणे

0
19

यावल ः प्रतिनिधी
जिल्ह्यात मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या जळगाव जिल्हा परिषद सदस्य संघटनेच्या अध्यक्षपदी यावल तालुक्यातील कॉंग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांची निवड राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली.
याबाबत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे पाटील व मार्गदर्शक राम जगदाळे यांच्याकडील नियुक्ती पत्र प्रभाकर सोनवणे यांना प्राप्त झाले आहे. जि.प.सदस्य व खेड्यापाड्यातील व अतिदुर्गम भागातील नागरिकांवर होणार्‍या अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या संघटनेची आवश्यकता असून त्याची जाणीव ठेवून जि.प.सदस्यांची संघटना स्थापन करण्यात आली आहे. शासनाकडून येणार्‍या निधीचा जिल्हा परिषदेत समान वाटप होऊन कुठल्याही सदस्यांवर अन्याय होणार नाही व शासकीय कामात दैनंदीन येणार्‍या अडीअडचणी व त्यांचे प्रश्‍न सोडविण्याबाबत जिल्हा परिषद संघटनेकडून प्रश्‍न सोडविले जाणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य असोसिएशन अध्यक्षपदी प्रभाकर सोनवणे (रा.वढोदे प्र.ता.यावल), जि.प.गट न्हावी-बामणोद यांची नियुक्ती झाल्याबद्दल आ.शिरीष चौधरी (महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी), उल्हास पाटील (प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष), संदीप भैय्या पाटील, (कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष, जळगाव), भगतसिंग पाटील (जिल्हा अध्यक्ष इंटक), माजी आ.रमेश चौधरी, हाजी शब्बीर शेठ (जिल्हा उपाध्यक्ष कॉग्रेस), वसंत रामजी महाजन (माजी प्रतोद कॉंग्रेस), जि.प. सदस्य सुरेखाताई पाटील, माजी सभापती लिलाधर चौधरी पं.स.सदस्य यावल, शिवराम तायडे (कॉंगेस ज्येष्ठ नेते, बामणोद), पं.स.गटनेते शेखर पाटील, पं.स.सदस्य सर्फराज तडवी, कालिमा तडवी, कृउबा माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी, यावल न.पा.गटनेता युनुस शेठ, फैजपूर गट नेता न.पा.कलीम मन्यार, यावल शहराध्यक्ष कदीर खान, माजी सभापती तथा उपसभापती उमाकांत रामराव पाटील, फैजपूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष रियाज आदींनी अभिनंदन केले आहे.
जिल्हा परिषद सदस्य असोसिएशन महाराष्ट्र जळगाव जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी माझ्यावर जी जबाबदारी संघटनेने सोपवली आहे ती पूर्णपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सध्या जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार कमी करण्यात आले असून ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी खूप अडचणी येत आहे. परंतु संघटनेच्या माध्यमातून सर्वपक्षीय जि.प. सदस्यांना सोबत घेऊन आवाज उठवून निश्‍चीत प्रयत्न करणार असून राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे पाटील, व मार्गदर्शक राम जगदाळे नवी मुंबई आणि नवी मुंबई शिवसेना नगरसेवक संजू वाडे यांच्यासह सर्वांचेच त्यांनी आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here