जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात आज कोरोना अहवालात दिवसभरात २८५ रूग्ण आढळून आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
जळगाव शहर-८१, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ-१०४, अमळनेर-५, चोपडा-२२, पाचोरा-३, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-३, रावेर-०, पारोळा-५, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-१२, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २८५ रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ८९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर १९ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ हजार ५८० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ३२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.