जिल्ह्यात आज एक रूग्ण कोरोनाबाधित आढळला

0
56
जिल्ह्यात आज एक रूग्ण कोरोनाबाधित आढळला

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरातून १ बाधित रूग्ण आढळून आला असून तर १ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरातून अमळनेर तालुक्यातून एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर एक रूग्ण दिवसभरातून बरा होवून घरी परतला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७३५ रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १५० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १० रूग्ण उपचार घेत आहे. तर २ हजार ५७५ रूग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here