जिल्ह्यात आज २७० रुग्ण कोरोनाबाधित आढळले. १४ बरे झाले

0
6

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात २७० बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर आणि चोपडा तालुक्यात कोरोना रूग्ण अधिक प्रमाणावर दिसून येत आहे. तर १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जळगाव शहर- ६६, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१३७, अमळनेर-०, चोपडा-८, पाचोरा-१०, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-२, एरंडोल-३, जामनेर-२, रावेर-४, पारोळा-१, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-१४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण २७० बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४४ हजार १६२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज दिवसभरात १४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ हजार ५८० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार २८८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here