जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा बंदचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देश बुडव्या धोरणाच्या विरोधात आज 27 सोमवार रोजी भारत बंद करण्याचे बुलंद हाक दिली आहे.
राज्यात हा बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिट पक्ष इत्यादी राजकीय पक्ष व सर्व पुरोगामी संघटनांनी बंदचे आवाहन केलेले आहे. जनविरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे ३ कृषी कायदे व ४ श्रम संहिता रद्द करा, विज दुरुस्ती विधेयक मागे घ्या; संपूर्ण उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव शेतकऱ्याना मिळावा यासाठी केंद्रीय कायदा करा; खाजगीकरणाचे धोरण बंद करा; डिझेल;पेट्रोल; गॅस इत्यादीचे भाव वाढ कमी करा;नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा;लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि देशाच्या संविधानाचे रक्षण करा इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी भारत बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आपणही जळगांव जिल्हा बंदचे आवाहन केलेले आहे. तेव्हा शेतकरी;कामगार; दलित;आदिवासी; शेतमजुर;कर्मचारी; विदयार्थी;शिक्षक;महिला आदींनी मोदी सरकारच्या विरोधात बंद पुकारलेला आहे. तेव्हा जळगांव जिल्ह्यातील जनतेने या भारत बंदमध्ये स्वयंपूर्तीने सहभाग घ्यावा असे आवाहन महाविकास आघाडी; महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा; माकप; भाकप; प्रहार जनशक्ती पक्ष; छावा मराठा युवा महासंघ; संविधान जागर समिती ; पुरोगामी संघटनांनी केलेली आहे.
यावेळी महाराष्ट्र जनक्रांतीचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, राजू मोरे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, संविधान जागर समिती संयोजक भारत ससाणे कादरीया फाऊंडेशन फारुख कादरी, कॉ. विजय पवार, प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष निलेश बोरा आदी उपस्थित राहणार आहे.