जिल्ह्यातील तीन जणांना आले यूपीएससी परीक्षेत यश

0
16
जिल्ह्यातील तीन जणांना आले यूपीएससी परीक्षेत यश

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात तीन जणांना यश मिळाले आहे. परीक्षांची अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झालेली आहे.

या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांचे अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यात जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी यशस्वी झाले आहे. यात चोपडा येथील गौरव साळुंखे हा देशभरातून १८२व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. भुसावळ येथील श्रीराज मधुकर वाणी यांना ४३० वी रँक तर जळगाव येथील अक्षय साबद्रा यांना ४८०वी रँक मिळाली आहे.

चोपडा येथील रहिवासी गौरव साळुंखे हा असून रवींद्र साळुंखे आणि सुरेखा साळुंखे यांचा चिरंजीव आहे रवींद्र साळुंखे व सुरेखा साळुंखे हे दोन्ही शिक्षक असून गौरवचे दहावीपर्यंतचे शिक्षण प्रताप विद्या मंदिर चोपडा येथे तर बारावीपर्यंतचे शिक्षण आर्टस् कॉमर्स सायन्स महाविद्यालय चोपडा येथे झालेले आहे .त्यानंतर गौरवने सिंहगड महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. अक्षय साबद्रा हा अक्षय मेडिकलचे संचालक प्रमोद नयनसुख साबद्रा आणि विनिता साबद्रा यांचा चिरंजीव आहे.

त्यांनी आपली पदवी बीकॉम पर्यंत शिक्षण घेऊन नंतर सीए परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. भुसावळ येथील श्रीराज मधुकर वाणी यांनी रँक प्राप्त केली आहे. श्रीराजने दहावीपर्यंतचे शिक्षण महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ तर बारावीचे शिक्षण पुणे येथे गरवारे महाविद्यालयात पूर्ण केले आहे त्यानंतर आय सी टी मुंबई येथे पदवीचे तंत्र शिक्षण पूर्ण केलेले आहे. मधुकर वाणी हे शिक्षक असून आई सुनंदा वाणी ह्या नोकरी करतात. दरम्यान, युपीएससीच्या परिक्षेत दीपस्तंभ फाऊंडेशने चार तर दर्जी फाऊंडेशनच्या तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here