जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अण्णासाहेब डॉ. सतिष भास्करराव पाटील यांनी आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या 2021-2026 निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आ. अनिल भाईदास पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहन सतिषराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालिका तिलोत्मा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळु पाटील, पारोळा पंचायत समितीचे माजी सभापती मनोराज पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ. शांताराम पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, हरिष पाटील, शिवाजी पवार, युवक तालुका अध्यक्ष योगेश रोकडे, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अंकूश भागवत, समता परिषद तालुका अध्यक्ष संतोष महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .