जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आता २४ तास डायलेसीस सेवा

0
27

जळगाव ः प्रतिनिधी
किडनी विकाराने त्रस्त रुग्णांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डायलेसीसची सुविधा २४ तास सुरू राहणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा कोविड रुग्णालयासाठी अधिग्रहित केल्याने नॉन कोविड रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली होती. गेल्या आठ दिवसांपूर्वी पुन्हा नॉन कोविड सुविधा सुरू करण्यात आल्याने त्यातीलच एक भाग असलेल्या किडनी विकाराने ग्रस्त रुग्णांसाठी आवश्यक असणारी डायलेसीस करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.पूर्वी मर्यादीत काळासाठी असलेली ही सुविधा यापुढे २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिले आहेत.
दिवसाचे उद्दिष्ट दहापर्यंत
नॉनकोविड सुविधेसह आता डायलेसीसला सुरुवात झाली आहे.आठवडाभरात दिवसाला कमीत कमी ३ ते ४ रुग्णांचे डायलेसीस करण्यात येत आहे.त्यात वाढ करून साधारणत: दिवसाला किमान १० डायलेसीस करून रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल,असे डॉ. रामानंद यांनी सांगितले. या विभागाचे काम अधिक प्रभावीपणे होण्यासाठी अमित भंगाळे व डॉ. शशिकांत गाजरे यांचे सहकार्य घेतले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here