जळगाव ः प्रतिनिधी
येथील जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढी तर्फे सभासदांना व सभासदाचे पत्नीस हृदयरोग शस्त्रक्रिया,एड्स,कॅन्सर, मुत्रपिंड रोपण या गंभीर आजारासाठी सेवेत असलेल्या सभासदांना ४१ हजार रु. व सेवानिवृत्त झालेल्या पण पतपेढीचे सभासद असलेल्या सभासदांना ५१ हजार रु.आर्थिक मदत सभासद कल्याण निधीतून करण्यात येत असते तर सभासदाचे नैसर्गिक अथवा अपघाती निधन झाल्यास एक लाख रुपयांची मदत सभासद कल्याण निधीतून धनादेशाद्वारे देण्यात येते.
या योजनेंतर्गंत संस्थेचे सभासद प्रमोद रामदास बेंडाळे यांच्या पत्नीच्या हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी ४१ हजार रुपयाची मदत सभासद कल्याण निधीतून चेकद्वारे संस्थेचे चेअरमन इंजि.साहेबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचे घरी जाऊन देण्यात आली. याप्रसंगी सचिव प्रेमराज निंबा पाटील व लिपीक राजेंद्र सुकदेव पाटील हे उपस्थित होते.
संस्थेचे सभासद सेवानिवृत्त झालेल्या पण पतपेढीचे सभासद असलेले इंजि. कृष्णा पुरूषोत्तम पाटील यांना हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी ५१ हजार रुपयाची मदत सभासद कल्याण निधीतून धनादेशाद्वारे देण्यात आली तसेच संस्थेचे सभासद इंजि.दिलीप दयाराम पाटील यांचे हृदयविकारामुळे निधन झाले.त्यांचे वारस असलेल्या पत्नी श्रीमती सुमित्रा पाटील यांना एक लाख रूपयाची आर्थिक मदत सभासद कल्याण निधीतून धनादेशाद्वारे देण्यात आली.