जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा दिव्यांग सेनेच्या आंदोलनाला अल्पसंख्यांक सेवा संघटनेचे जाहीर पाठींबा दिला आहे.
दिव्यांग सेनेने जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव समोर 35 किलो धान्य तात्काळ वाटप करण्यात साठी आंदोलन सुरू केले. या रास्त मागणीला अल्पसंख्यांक सेवा संघटनेने जाहीर पाठिंबा दिला.पाठिंबा देऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना जहाँगीर ए खान प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक सेवा संघटना, जिल्हा अध्यक्ष अपंग मुंतझिम खान , दीव्यांग सेना राज्य सचिव भरत जाधव,अक्षय महाजन,शकील शेख,हितेश तायडे, भिमराव म्हस्के,तोहसिफ शाह,सादिक पिंजारी,नितीन सूर्यवंशी, धनेश्वर पाटील आदी उपस्थित होते.