जळगाव, प्रतिनिधी । शहरातील द्रोपदी नगरातील एका वकिलाची १३ हजार रुपये किमतीची सायकल चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी तपास चक्र फिरवून आरोपीला अटक करून त्याच्याकडील सायकल मिळवून फिर्यादीस आज परत दिली.
फिर्यादी ऍड योगेश शरद महाजन रा द्रौपदी नगर जळगाव यांचे मार्च 2021 मुद्दे राहते घरून हरकुलस कंपनीची 13000/-रुपयांची सायकल चोरीस गेली होती त्याबाबत जिल्हापेठ पोस्टेत येथे फिर्याद दिलेने कलम-379 IPC चा गुन्हा दाखल होता. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो ना प्रदीप पाटील यांचे कडे तपास दिला असता गोपनीय खात्रीशीर बातमीदारा कडून मिळालेले बातमीवरून नमूद सायकल आरोपी नामे ईस्त्यायीक अली राजीव अली रा. तांबापुरा जळगाव याचे ताब्यात मिळालेने व फिर्यादीची नमूद सायकल त्यांचीच असलेचे ओळखले नमूद आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादीला आपली सायकल आता परत कधीच मिळणार नाही असे वाटत असतांना त्यांची सायकल मिळालेने त्यांनी अत्यानंद झालेचे पोलिसांना सांगितले व त्यांचे मुलास त्याहीपेक्षा जास्त आनंद झालेचे फिर्यादी यांनी सांगितले आहे.