जळगाव : प्रतिनिधी
केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करा आणि कामगारविरोधी कायदे मागे घ्या या प्रमुख मागण्यांसाठी दिल्ली येथे गेल्या अठरा दिवसापासून सुरु असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भारतभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज विविध सामाजिक तसेच शेतकरी संघटनातर्फे धरणे आंदोलन व अन्नत्याग सत्याग्रह सुरु करण्यात आला आहे.
राष्ट्रीय आंदोलनास प्रतिसाद देण्यासाठी १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व अन्नत्याग सत्याग्रह केला जात आहे.या आंदोलनात शेतकरी, कामगार तसेच बुद्धीजीवी सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, लोक संघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, नियाजअली फौन्डेशनचे अयाजअली, छावा युवा मराठा महासंघाचे अमोल कोल्हे, बुलंद छावाचे प्रमोद पाटील, कादरीया फौन्डेशनचे फारुख कादरी, मराठा सेवा संघाचे राम पवार,मौलाना आझाद मंचचे अ.करीम सालार,लोकसंघर्ष मोर्चाचे भरत कर्डिले, माळी महासंघाचे शालिग्राम मालकर,संभाजी बिग्रेडचे खुशाल चव्हाण, श्रीकांत मोरे, चंदन बिर्हाडे, सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे, छावा मराठा हरीश जाधव,सागर पाटील इत्यादि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.