जळगाव, प्रतिनिधी । प्रसिध्द केशरचनाकार मेकअप आँटिस्ट जावेद हबीब (हकीम) वर कडक कारवाई करण्यात यावी, याबाबतचे निवेदन हिंदू राष्ट्रसेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.
सविस्तर असे आहे की, प्रसिध्द केशरचनाकार मेकअप आँटिस्ट जावेद हबीब (हकीम) यांनी नुकतेच ऐका कार्यक्रमामध्ये केशरचनेचे प्रात्यक्षिक दाखविताना पाणी संपले म्हणुन अनेक महिलांसमोर ऐका महिलेच्या डोक्यावर थुकुंन तिचा अवमान करत उर्वरित केशरचना पुर्ण केली. सदर महिलेने त्याच रोजी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुर्णतः घडलेला हा प्रकार हा अतिशय निदंनय असून एका सुप्रसिध्द व्यक्तीने असे कृत्य करणे हे निदनीय आणि निश्चितच निषेधार्थ आहे, हा प्रकार सदर महिलेचाच नाही तर संपुर्ण स्त्रिवर्गाचा मोठा अपमान आहे. कोरोना काळात मास्क वापरणे अनिर्वाय आहे असे असतांना असे जाहीर कार्यक्रमात मास्क न वापरता सर्वांसमोर थुकंणे हा आपत्ती निवारण कायद्याच्या दुष्टीने गुन्हा आहे, भारतीय संविधानाने भारतीय स्त्रियांच्या आत्मसम्मानासाठी कायदे बनवले आहे त्या कायद्यानवे हे कृत्य गुन्हा ठरते.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अनन्य साधारण महत्व आहे, माता सिता, द्रोपदी, संत मीरा, संत मुक्ताई, संत सखुजनाबाई, राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झांशीची राणी लश्मीबाई, राणी पद्दवती, सावित्री बाई फुले, माजी पतंप्रधान स्वः इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आदी भगिनी निवेदिता अशा सर्व महिलांना पूजनीय वंदनीय असे म्हटले आहे. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना माते समान म्हटले आहे त्यांच्या चरणाचे तीर्थ प्यायची आपली हिदूं संस्कृती आहे. अशा संस्कृतीचा आणि समस्त माता वर्गाचा हा अपमान आहे असे हिदूंराष्ट्रसेना मानते त्यामुळे महोदय निवेदनाद्वारे खालील मागण्या करत आहे.
अश्या आहेत मागण्या
१) जावेद हबीब (हकीम) यास त्वरित अटक करुन त्यावर कठोर कारवाई करावी.
२) जावेद हबीब( हकीम) याच्या जेवड्या ठिकाणी त्याच्या दुकाने आणि फ्रच्यायजी आहे तेवढ्या ठिकाणी चौकशी करुन येणार्या इनकम चे काही काळे गोरे तर नाही याची चौकशी करुन कारवाई करावी.
३) महाराष्ट्रात जेवढ्या ठिकाणी त्यांची दुकाने कायम स्वरुपात बंद कृम्यात यावी जेणे करुन पुढे अशी कोणी हिमंत करणार नाही. असे आपणास निवेदन करत आहै
