जामनेर, प्रतिनिधी । जामनेर पाचोरा महामार्गावर शहरातीलअंतरावरच नागदेवता मंदिराजवळ इंडिका कार व आयशर ट्रक ज्यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने इंडिगोकार मधील बसलेले दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी नऊ दहाच्या सुमारास घटना घडली.
जामनेर पाचोरा महामार्गावर नागदेवता मंदिराजवळ भुसावल कडून येणाऱ्या इंडिगो कार व पाचोरा कडून येणाऱ्या आशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून यात एक महिला व एक पुरुष जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालय उपचारार्थ दाखल केले आहे आज सकाळी भुसावळ येथील रहिवाशी इंडिगो कारmh18w2412 ने लग्नकार्यासाठी जामनेर मार्गे जात असताना जामनेर शहरापासून पाचोरा रोड असल्यांना नागदेवता मंदिराजवळ पहूर कडून येणाऱ्या आयशर ट्रक ने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने या कार मधील पंकज गोविंदा सैदाणे वय 25 सुजाता प्रवीण हिवरे y30 हे दोघी जागीच ठार झाले असून तर हर्ष पंकज सैदाणे नेहा अग्रवाल प्रतिभा सैदाणे तिघे अत्यंत गंभीर जखमी झाले आहे या सर्व जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालय उपचारार्थ दाखल केले आहे या अपघाताची माहिती करतात जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांचे सहकारी यांनी जखमींना हलवण्यात मदत कार्य सुरू केले आहे या दोन दिवसापूर्वीच गारखेडा येथे अपघात झाल्याने त्यात तीन जण जागीच ठार झाले होते अपघाताची मालिका सुरू असल्याचं आज पुन्हा दिसून आले त्यामुळे जामनेर तालुक्याच्या नागरिक घाबरले आहे शासनाने लवकर एसटी महामंडळ गाड्या सुरू करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.