जामनेर, प्रतिनिधी । शहरातील विशाल लॉन्स जामनेर येथे अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडी. जामनेर. तालुकास्तरीय बैठक संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला कैकाडी समाजाचे दैवत श्री संत कैकाडी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली.
बैठकीला खानदेश संपर्कप्रमुख मुकेश जाधव, जळगाव जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष मुकेश जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार केला व मार्गदर्शन केले.
जामनेर तालुक्यातील नेरी येथील सागर गायकवाड. यांची कैकाडी समाज आघाडी युवा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. जामनेर तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांचा कैकाडी समाज आघाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश संपर्कप्रमुख मुकेश दादा जाधव. हे होते. त्यांनी जामनेर तालुक्यातील प्रत्येक समाज बांधव कडे जाऊन 1) सर्वे करणे 2) रेशन कार्ड आधार कार्ड आहे किंवा नाही याबाबत विचारणा करणे 3) समाजातील विधवा वयस्कर लोकांचे संजय गांधी चे प्रकरण तयार करणे 4) पंचायत समितीत जाऊन दारिद्र्य रेषेतील लोकांची यादी काढणे 5) समाजातील गरीब विद्यार्थ्यांना वह्या पेन यांचे वाटप करणे इ.मार्गदर्शन केले. यावेळी जामनेर तालुक्यातील पदाधिकारी जामनेर तालुका सचिव अजय जाधव. जामनेर तालुका उपाध्यक्ष नवल जाधव. सदस्य अजय गायकवाड. सचिन जाधव हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका युवा अध्यक्ष रवींद्र भाऊ जाधव यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार आघाडीचे जामनेर तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड. यांनी मानले या बैठकीला जामनेर तालुक्यातील कैकाडी समाज बांधव भगिनी उपस्थित होते. या बैठकीचे मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष शिरीषकुमार आसाराम जाधव व राज्य अध्यक्ष श्शेखर जाधव हे होतो.
