जामनेर (प्रतिनिधि) – जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचा 2003 ते 2008 साठी संचालक मंडळ चेंज रिपोर्ट करीता सन 2004 मध्ये दिवंगत आबाजी नाना पाटील यांनी केलेला अर्ज क्रमांक 614/2004 धर्मदाय आयुक्त जळगाव यांनी फेटाळून दिला आहे. तसा आदेश 21/09/2021 रोजी पारित केलेला आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी मधे संचालक मंडळ अधिकृत कोण याबाबत बऱ्याच वर्षा पासून वाद असून 1999 पासून संस्थेचे चेंज रिपोर्ट प्रलंबित असल्याने संस्थेचे खरे हक्कदार कोण हे प्रश्न चिन्ह कायम आहे. प्रशासकीय लढाई सुरु असताना 1999 ते 2003 या काळात दिवंगतआबाजी नाना पाटील व नारायण चौधरी यांनी अध्यक्ष व सचिव म्हणुन काम पाहिले तर 2003 ते 2008 संचालक मंडळ निवडी वेळी मोठी उलथा पालथ होऊन अध्यक्ष दिवंगत आबाजी नाना पाटिल व सचिव सुरेश मनोहरलाल धारीवाल यांची निवड झाली. मागील चेंज रिपोर्ट ला मान्यता नसतांना तो कालावधी निघून गेला पुन्हा 2004 साली दिवंगत अध्यक्ष आबाजी नाना पाटिल यांनी 2003 ते 2008 साठी नवीन संचालक मंडळ साठी चेंज रिपोर्ट दाखल केला होता . तो चेंज रिपोर्ट 21/09/2021 रोजी धर्मदाय आयुक्त यांनी उच्च न्यायालय यांचेकडील 27/04/2017 रोजी च्या प्रलंबित चेंज रिपोर्ट निकाली काढण्याच्या आदेशाचा संदर्भ घेऊन दिलीप विठ्ठल महाजन यांचा तक्रारी अर्ज ग्राह्य धरून तो चेंज रिपोर्ट फेटाळून लावला.2015 पर्यंत सुप्त असणारा संचालक मंडळाचा वाद दिवंगत आबाजी नाना पाटिल ज्या वेळी अचानक धारीवाल गटाला सोडुन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या गोटात सामील झाले तेव्हा त्याने वेगळं वळण घेऊन 2018 साली दोन समांतर संचालक मंडळ काम पाहत आहे. आजची प्रेस नोट आमदार गिरीश महाजन गटाने पत्रकारांना दिली असली तरी दिवंगत आबाजी नाना पाटील यांचा बदल अर्ज फेटाळला असल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात संदिग्नता निर्माण झाली आहे.1999ते 2003 साठी असणाऱ्या संचालक मंडळाचा2000 साली दाखल चेंज रिपोर्ट 30/01/2021 रोजी याअगोदर फेटाळला गेला आहे.