जामनेर (प्रतिनिधी):- शहरात आमदार गिरीष महाजन व नगराध्यक्षा सौ. साधना महाजन यांच्या हस्ते सकाळी १० वाजता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चौकात व नगर परिषद मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जामनेर तालुका एजूकेशन चे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, सिने ट सदस्य दीपक पाटील, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बावीस्कर, बाबूराव हिवराळे, नाना वाणी, उल्हास पाटील, शेख रिजवान, खलील भांजा,अतिश झा लटे, यांच्यासह डॉ. संजीव पाटील, जे के चव्हाण, बाबूराव गवळी, शंकर राजपूत, कैलास पालवे, सुभाष पवार, दत्तू काळे, विनोद माळी, डॉ. बाजीराव पाटील, नितीन झाल्टे, आबासाहेब पाटील, भगवान शिंदे, अनिल बोहरा, विलास हिवराळे, शेख इम्रान, संजय सूर्यवंशी सर, विशाल महाजन, गणेश चौधरी, समाधान राजूरकर यांच्या सह शहरातील व तालुक्यातील शिवप्रेमीनी महाराजांना अभिवादन केले.
दुसऱ्या एका कार्यक्रमात शिवप्रेमी तर्फे मोटार सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
सोन बर्ड्डी च्या पायथ्यापासून सुरू झालेले मोटार सायकल रॅली संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करीत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून समारोप करण्यात आला. यावेळी शिवप्रेमीं चा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.