जामनेर(प्रतिनिधी): – मसाप जामनेर शाखेची स्थापना झाली असुन परिषदेचे जिल्हा प्रतिनीधी प्राचार्य तानसेन जगतप यांनी मान्यता पत्र रविवारी शाखा अध्यक्ष डॉ.अशोक कोळी यांना दिले.
कला, वाणिज्य व विज्ञान महविद्यालयात मसाप शाखेची सर्व साधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक नाना लामखेडे होते. चाळीसगांवचे कार्यवाह प्रा. मनोहर आंधळे, गणेश आढाव, प्रा. सुधीर साठे, डॉ निळकंठ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यकारिणी अशी : अध्यक्ष डॉ.अशोक कोळी, उपाध्यक्ष सुहास चौधरी, सुधाकर चौधरी, कार्याध्यक्ष डॉ. संदीप माळी, प्रमुख कार्यवाह डॉ.विजयेंद्र पाटील, कोषाध्यक्ष किशोर काळे, कार्यवाह डॉ. आशिष महाजन, रत्नकांत सुतार, सदस्य प्रा.पुरुषोत्तम महाजन, गणेश राऊत, संदीप गायकवाड, आकोश कोळी, मोहन सारस्वत, डॉ स्वाती विसपुते, स्नेहल पाटील डॉ.संगीत गावंडे, नामदेव पाटोळे.
यावेळी उमवी व्यवस्थापन परिषद सदस्य दिपक पाटील, डॉ राजेश सोनवणे, कडु माळी, पं.ना.पाटील, डॉ.चंद्रशेखर पाटील, मिलींद लोखंडे उपस्थीत होते.
संचलन प्रा पुुरुषोत्तम महाजन यांनी केले. प्रास्तावीक व आभार डॉ. अशोक कोळी यांनी मानले.
