जामनेर : प्रतिनिधी
येथील जामनेरपुरा, इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयातील, क्रीडा शिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार यांनी शैक्षणिक तथा क्रीडा क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेत आदिल शहा फारुकी बहुउद्देशीय संस्था, अडावद (ता.चोपडा) या संस्थेमार्फत ‘खान्देश भूषण पुरस्कार-२०२०’ साठी निवड घोषित करण्यात आली.
हा पुरस्कार जळगाव येथील पत्रकार भवनात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दि.१३ डिसेंबर २०२० रोजी प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. या यशाबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुल संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, मुख्याध्यापक एस.बी.भोई, उपप्राचार्य प्रा.जे.पी.पाटील, पर्यवेक्षक प्रा.के.एन मराठे, पर्यवेक्षक प्रा.आर.ए. पाटील, क्रीडा विभाग प्रमुख जी.सी. पाटील, महाराष्ट्र राज्य थलेटिक्स संघटनेचे संचालक तथा तांत्रिक समिती अधिकारी राजेश जाधव, महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी अभिनंदन केले.