जळगाव : जागतिक कृषी महोत्सव-2022 अंतर्गत शहरातील मोहाडी रोडवरील स्वामी समर्थ मंदिर परिसरात आयोजित विभागीय कृषी महोत्सव कार्यस्थळी काल बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पूर्वीप्रमाणे उत्पादन काढल्या जाणार्या अर्थात सेंद्रिय शेती अंतर्गत बाजरी, नागली व ज्वारी यांच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. तसेच त्या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्रातर्फे आयोजित नेत्र तपासणी, हाडांची तपासणी, दंत तपासणी यासह पर्यावरण प्रकृती विभागातर्फे आयोजित वृक्षारोपण, बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून आयोजित विविध सांस्कृतिक व देशभक्तिपर गीतांच्या कार्यक्रमालाही भेट दिली.
याप्रसंगी कृषी महोत्सवाचे जिल्हा प्रतिनिधी श्री.निकम साहेब, कृषी प्रतिनिधी श्री.पी.के.पाटील, पर्यावरण प्रतिनिधी श्री.वसंत पाटील, श्री.हेमंत पाटील (शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी), डॉ. सुदाम पाटील (तेलबिया संशोधन केंद्र), श्री.वैभव सूर्यवंशी (कृषी विज्ञान केंद्र), डॉ.विनोद शहा, डॉ. सोनार (आयुर्वेद आरोग्य विभाग), डॉ. हर्षदा देशपांडे (गर्भसंस्कार विभाग) आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
