जळगाव, प्रतिनिधी । प्रत्येक वर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिवस साजरा केला जातो. इंडियन डेंटल असोशिएशनच्या सदस्य डॉ. भाग्यश्री किशोर बडगुजर यांचा ‘जागतिक कर्करोग दिना’च्या पार्श्वभूमीवर विशेष लेख.
कॅन्सर विरोधात लढा देणे व देशात जनजागृती करणे हा या दिवसाचा एकमेव उद्देश आहे. मुख कर्करोग ही भारतासह जगासमोरची एक प्रमुख समस्या आहे. दरवर्षी जवळपास ९ कोटी ६ लाख लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे होतो. हा पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. गेल्या तीन दशकांपासून गुटखा युवकांच्या मनावरील अधिराज्य करत आहे. महाविद्यालयीन युवकांना तर धूम्रपानाचे व्यसन जडले आहे.
आधी मुख कर्करोगाचे प्रमाण वयाच्या पन्नाशीनंतर आढळून येत होते आता वीस वर्षे व त्यावरील युवकात हा प्रकार आढळून येत आहे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून चिंताजनक आहे. गुटख्यामुळे होणाऱ्या या आजारामुळे वैद्यकीय उपचारांवर दहापट अधिक खर्च होत आहे. अनेकदा मुख कर्करोगाची सुरुवात झालेली झालेले रुग्ण उपचारासाठी येत असतात. उपचारानंतर ४० टक्के रुग्ण बरे होतात तर पहिल्या टप्प्यात येणारे ८० टक्के रुग्ण बरे होतात. म्हणूनच या रोगाचे निदान लवकर होणे आवश्यक आहे. बदलती जीवनशैली, भेसळ युक्त आहार, तंबाखू, गुटखा, पान मसाला, सुपारी, सिगारेट, बिडी, चिलीम हुक्का, मद्यपान याचे व्यसन करणाऱ्या व्यक्तींना तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. तोंडाच्या कर्करोगाची सुरुवात हळू होत असते. तिच्या तोंडामध्ये सुरुवातीला पांढरे चट्टे व लाल चट्टे दिसतात.
तोंडात जखमावर सूज येऊन वेदना होऊ लागतात. तोंडातून रक्तस्राव होणे. तोंड उघडण्यास त्रास होणे. अन्न गिळतांना त्रास होणे, वजन कमी होते, तंबाखूसेवन, मद्यपान व धूम्रपान करू नये. सात्विक आहार, नियमित व्यायाम, लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करावी. विषाणूंमुळे होणाऱ्या कर्करोगा विरुद्ध मानवी पॉपीलोमा विषाणू लस, हिपॅटिटीस लस बी याचा वापर केला जातो. मुख कर्करोग कोणत्या स्टेजमध्ये आहे. यावर उपचार अवलंबून असतो. सर्जरी व केमोथेरपीद्वारे उपचार केला जातो व कर्करोगाचे निदान सुरुवातीला झाल्यास त्यावर शस्त्रक्रिया करून काढून टाकल्यास त्याचापासून बचाव होऊ शकतो. तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणणे हा एकमेव पर्याय आहे.
डॉ. भाग्यश्री किशोर बडगुजर
(सदस्य, इंडियन डेंटल असोशिएशन)