जळगाव शहर 100 टक्के लसीकरण करणार – महापौर जयश्री महाजन

0
4

जळगाव : प्रतिनिधी I येथील ॲड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोवीड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने लसीकरण शिबिर आयोजित केले होते.

लसीकरण शिबिराचे उद्घाटन जळगाव शहराच्या महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी शहराचे 100 टक्के लसीकरण करण्याचा मानस बोलून दाखवला आणि त्या दृष्टीने शहरातील प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण केले जाईल असेही त्यांनी सांगीतले. विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत आणि कोरोनाला न घाबरता त्याचा प्रसार होणार नाही यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल लोहार यांनी महाविद्यालयाने दुस-यांदा लसीकरणाचा उपक्रम राबविल्याचे सांगीतले. लसीकरणा सोबतच कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत असे सर्वांना आवाहन केले.

लसीकरण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर महापौर जयश्रीताई महाजन, प्राचार्य डॉ.अनिल लोहार, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष यशवंत चौधरी तसेच मनपा आरोग्य विभागाच्या जयश्री धोटे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचलन डॉ. के.व्ही. पाटील यांनी केले. महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी इरफान पिंजारी तसेच प्रा.आर.पी.सोनवणे, प्रा.मनोज सोनवणे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.महाविद्यालयाच्या 185 विद्यार्थ्यांनी लसीकरण शिबीराचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here